पत्नीची हत्या करणाऱ्या जवानाला पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिकमध्ये किरकोळ वादातून गुरुवारी मध्यरात्री पत्नीची गळा दाबून हत्या केल्याप्रकरणी लष्करी जवानाला न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पेठरोडच्या इंद्रप्रस्थनगरी येथे पत्नी चैताली ( वय 23) हिची गळा दाबून हत्या केल्यानंतर सुनील श्रीधर बावा या लष्करी जवानाने चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चैतालीचे वडील प्रकाश बावा यांच्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात सुनीलविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी गुरुवारी सुनीलला अटक केली, अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक निरीक्षक शिवाजी अहिरे यांनी दिली.