
‘आम्ही सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग’, असा सवाल करतानाच ‘आता त्यांनी आमचे फोन घेणे सुद्धा बंद केले’, असा आरोप तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या काजल गुरु यांनी केला आहे. आपली नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले की, जर त्यांनी कामे केली नाहीत, तर पुढल्यावेळी आम्ही त्यांना मतदान करणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
सुजय विखे जेव्हा लोकसभा निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांची काही लोक आली व तुमची दफनविधी व घरकुलांची कामे करतो, असे आम्हाला आश्वासन दिले. ते निवडून आता वर्ष होत आले. आम्ही त्यांना पत्र देऊन थकलो. पण आमचे कोणतेही काम मार्गी लागले नाही. त्यामुळे सुजय विखे यांचा मी निषेध करते, असे ते म्हणाले. ‘तृतीयपंथीयांची कामे करू शकत नाही. विखे हे फोन सुद्धा उचलत नाही. ते भेटत नाहीत. मी हे त्यांचे नाव घेऊन सांगते. कारण आम्ही कुणाला घाबरत नाही’, असेही त्यांनी सांगितले.



























































