‘ढ’ मुलांवरील उपचारासाठी ‘भाटिया’चे प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुले अभ्यासात ‘ढ’ आहेत का याचे निदान करून त्यांना योग्य प्रकारे हाताळण्याचे तंत्र जाणून घ्यायचे असेल तर भाटिया रुग्णालयातील तज्ञांची भेट घ्यावी लागेल. अशा मुलांच्या व्यवस्थापनाप्रति एका विशेष प्रमाणपत्र कार्यक्रमाचे आयोजन या रुग्णालयातील पीडियाट्रीय न्यूरो डेव्हलपमेंटल तज्ञ डॉ. संतोष कोंडेकर यांनी केले होते.

या कार्यक्रमांतर्गत शिक्षक, समुपदेशक, थेरपिस्ट आणि मानसोपचारतज्ञ यांना अशा मुलांना ओळखून त्यांच्यासाठी काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. शिकण्यास सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत होणारे अयोग्य बदल आणि मानसिक समस्या कमी कशा करता येतील त्याचे प्रशिक्षण या कार्यक्रमात दिले जाते. योग्य वेळी या समस्यांचे निराकरण केले नाही तर ती समस्या विकृती बनू शकते आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.

शालेय प्रोफेशनल्सना शाळांमध्ये योग्य वर्तन किंवा चांगली प्रगती करण्यामध्ये असमर्थ ठरणाऱया विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांना उत्तम प्रकारे समजण्यामध्ये मदत करण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याचा उद्देशाने या कार्यक्रमाची रचना करण्यात आली होती. त्यांना अभ्यासात ‘ढ’ असलेल्या मुलांच्या गरजा समजण्यामध्ये मदत करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.