
देवगड नांदगाव महामार्गावरील लिंगडाळ तिठा ते नांदगाव पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण काम करण्यात यावे सदर कामास मंजुरी असूनही कामास विलंब होत होता. त्यामुळे लोकशाही मार्गाने शिवसेनेच्या वतीने नागरिक व वाहनचालकांच्या वतीने रास्ता रोकोचा इशारा तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी दिला होता. संबंधित प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन डांबरीकरणाचे कामास लिंगडाळ तिठा येथून सुरुवात केल्याने शिवसेनेने 4 मार्च रोजी जाहीर केलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे अशी माहिती तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी दिली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख विलास साळसकर तालुकाप्रमुख एड प्रसाद करंदीकर, मिलिंद साटम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करुन या डांबरीकरणाचे कामात खंड न पाडण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. येत्या 15 दिवसात लिंगडाळ तिठा ते नांदगाव पर्यतचे डांबरीकरणाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन ही सार्वजनिक बांधकाम प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच सांगून महाविकास आघाडी सरकार प्रगती सरकार आहे व शेतकरी व जनतेचे सरकार आहे असे स्पष्ट केले.



























































