
उत्तर प्रदेशातील भाजपचा निलंबित आमदार कुलदीप सेंगर याला बुधवारी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले. सेंगर हा उन्नाव बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांच्या हत्या प्रकरणात दोषी ठरला आहे. न्यायालय त्याला 12 मार्चला शिक्षा सुनावणार आहे. आरोपी कुलदीप सेंगरचा बलात्कारपीडितेच्या वडिलांना ठार मारण्याचा हेतू नव्हता, मात्र ज्या पद्धतीने पीडितेच्या वडिलांची हत्या झाली ती अत्यंत क्रूर घटना होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. सेंगरने उन्नाव येथे अल्पवयीन मुलीकर बलात्कार केल्याची घटना 2017 साली घडली होती. पीडितेवर सामूहिक बलात्कार केलेल्या नराधमांनी जामिनावर सुटून तिला जाळले होते. 90 टक्के भाजलेल्या पीडितेचा डिसेंबर 2019 मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याआधीच तिच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती.




























































