दहिसर अशोकवनच्या आगीत सहा दुकाने खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर पूर्व येथील अशोकवन येथे गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत सहा दुकाने जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या आगीत कुणीही जखमी झाले नाही.

दहिसर पूर्व येथील चिंतामणी प्लाझा इमारतीत 10 वाजून 44 मिनिटांनी ही आग लागली. या ठिकाणच्या तळमजल्यावरील एका एटीएम मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका उडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच पाच टँकर च्या सहाय्याने 20 मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या आगीत एक एटीएम, चष्मा दुकान, स्टेशनरी दुकान जळल्याची माहिती नगरसेवक संजय घाडी यांनी दिली. दरम्यान, या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.