
बेअरिंग्ज बदलण्याच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेला शीव उड्डाणपूल सोमवारी पहाटे 6 वाजल्यापासून वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाच्या बेअरिंग्ज बदलण्याचे तिसऱया टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यात 16 बेअरिंग्ज बदलण्यात आल्या अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली.





























































