
कोरोना वायरसचा फटका सूरतच्या हिरे व्यापार्यालाही बसला आहे. यंदा हिरे व्यापार्याला 600 कोटींचे नुकसान झाले आहे.
सूरतमध्ये सर्वाधिक हिरे पॉलिश करणारे कामगार आहेत. सूरतमध्ये जवळपास 5 लाख हिरे पॉलिश करणारे कामगार असून 4 हजारे 500 छोटे आणि मध्यम स्वरुपाचे हिर्यांचे कारखाने आहेत.
कोरोनामुळे चीन आणि हाँगकाँगमध्ये 17 तारखेपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दोन्ही देशातील हिरे बाजार पुन्हा सुरू व्हायला अजून दोन महिने लागतील. हिंदुस्थानातून अमेरिकेत 38 टक्के हिरे निर्यात होतात, हाँगकाँगमध्ये 37 टक्के तर चीनमध्ये 8 टक्के हिरे निर्यात होतात. हाँगकाँगशी असलेला हिरे व्यापार 10 टक्क्यांनी घटला आहे. तर चीनशी 50 टक्क्यांनी घटला आहे.
जानेवारी 2019 मध्ये सूरतमध्ये 12 हजार 365 कोटींचा व्यवसाय झाला होता. तर जानेवारी 2020 मध्ये 11 हजार 757 कोटींचा व्यवसाय झाला होता. फेब्रुवारीचा आकडा अजून कळाला नाही. एप्रिल 2019 ते जानेवारी दरम्यान एक लाख 14 हजार 982 कोटींच्या किंमतीचे हिरे परदेशात निर्यात करण्यात आलेह ओते. तर एप्रिल 2018 ते जानेवारी 2019 दरम्यान 1 लाख 36 हजार 942 कोटींचे हिरे परदेशात निर्यात करण्यात आले होते.
अनेक बड्या कंपनींकडून हिर्यांची मागणी घटल्याने अनेक हिरे कंपन्यांनी उत्पादन घटवले आहे, तसेच कामगार कपातही केली आहे.























































