शिवशाहीला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर शिवशाही बसला अचानक आग लागली. या आगीत गाडीचे अतोनात नुकसान झाले आहे.

आनंदवाडी येथे राज्य परिवहन महामंडळ महामंडळाची शिवशाही बसला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आहे. सुदैवानं या बसमधील 25 प्रवाशांचा जीव वाचला आहे. नाशिक हुन पुण्याकडे बस क्रमांक एम एच 14 GU  2445 ही बस आनंदवाडी शिवारात येताच या बसने अचानक पेट घेतला. बसला आग लागली हे वाहन चालक अहिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बस बाजूला घेत यातील प्रवाशांना बाहेर काढलं यामुळे सुदैवानं या प्रवाशांचा प्राण वाचले आहेत. अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

burned-shivshahi-2