आष्टीत कोरोनाची अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आष्टीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची अफवा पसरवणाऱ्या आरोपीविरुद्ध आष्टी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आष्टीमध्ये एका मित्राने मोबाईलवर स्टेटस बघ असे सांगितले. पीडित मुलाने स्टेटस बघितला तर पहिल्या स्टेटसमध्ये आष्टीत कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला, पीडित रूग्णाचे नाव व त्यामध्ये गोल आकाराचा मुलाचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या स्टेटसमध्ये आष्टीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याचे वृत्तवाहिनीचे कोरोनासंबंधीचे वार्तांकन आणि नंतर तीन नंबरच्या स्टेटसमध्ये अशाच प्रकारचे दुसऱ्या वृत्तवाहिनीचे वार्तांकन असे तीन स्टेटस टाकण्यात आले. हे स्टेट्स बघून पीडित मुलाला मानसिक धक्का बसला. ते स्टेटस तातडीने डिलीट कर असे सांगितले तरीही आरोपीने ते स्टेटस व्हायरल केले.

या प्रकाराने पीडिताच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. त्याने तातडीने आष्टी पोलिसात धाव घेतली. तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक एम.बी.सूर्यवंशी यांनी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आणि तातडीने त्या आरोपीविरूद्ध आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.