
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (मेट्रो, मोनो, रेल्वे) बंद ठेवण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. मात्र तरी देखील मेट्रो बंद अशा अफवा पसरू लागल्या आहेत. त्या अफवा रोखण्यासाठी मुंबई मेट्रोकडून ट्विटर हँडलवरून मेट्रो नेहमी प्रमाणे सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे सांगण्यात आले आहे.
UPDATE | We wish to keep our esteemed commuters informed that, metro services are running as per normal schedule. #HaveANiceDay
— Mumbai Metro (@MumbaiMetro01) March 17, 2020

























































