शासनाच्या आदेशानंतरही परळीत भरला आठवडी बाजार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या आजाराची लागण होऊ नये म्हणून देण्यात आलेल्या सुचनांमध्ये पुढील सूचना मिळेपर्यंत आठवडी बाजार भरवू नये असेही म्हटले होते.बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनीही तसा आदेश जारी केला होता. मात्र तरीही परळीमध्ये आठवडा बाजार भरला होता. भाजी विक्रेत्यांना याबाबत विचारले असता सरकारी आदेशाबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासन कोरोना व्हायरस बाबतीत कुठलाही धोका पत्करायला तयार नाही याच्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बीड यांनी रविवारी रात्री याबाबतचा आदेश काढत आठवडी बाजार भरू नका असे सांगितले होते.बाजारामुळे त्या परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. बाजारासाठी अनेक जण लांबून प्रवास करत इथे पोहचत असता. एसटी किंवा अन्य वाहनांमध्ये त्यांना या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे हा बाजार भरवू नये असे शासनाने सांगितले होते. मात्र आपल्यापर्यंत आदेश पोहोचला नसल्याचे कारण सांगत हे भाजी विक्रेते बाजारात त्यांची दुकाने थाटून बसले होते. एक-दोन भाजी भाजी विक्रेते सोडले तर इतर कोणीही नाक तोंड मास्कने झाकलेलं नव्हतं. या प्रकाराबाबत परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्याशी सामना प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.