कोरोनाशी लढण्यासाठी बिल गेटस् देणार 10 कोटी डॉलर्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाभयंकर कोरोना विषाणूशी लढण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांच्या गेटस् फाऊंडेशनने संपूर्ण जगभरात 10 कोटी डॉलर्स देणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय वॉशिंग्टनच्या मदतीसाठी 50 लाख डॉलर्स देणार आहेत. गुरुवारी जगभरातील नागरिकांना कोरोनाच्या फैलावामुळे घाबरून न जाता या संकटाला सर्वांनी धैर्याने सामोरे जाऊया, असे आवाहन केले.