#Corona सर्दी, पडसे झालेल्यांचीही तपासणी होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संक्रमितांचा आकडा तीनशेच्या जवळ पोहोचल्याने अवघ्या देशाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने आपल्या धोरणात तात्काळ बदल केला असून सर्दी, पडसे, श्वसनाचा त्रास होत असेल, ताप, खोकला येत असेल अशा रुग्णांचीही कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कालपर्यंत प्रयोगशाळांमध्ये केवळ कोरोनाचा संसर्ग असेल तरच तपासणी करण्यात येत होती, मात्र कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.