ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या 12; एका दिवसात पुन्हा दोन रुग्णांची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचे आणखी दोन रुग्ण ठाण्यात आढळले आहेत. वर्तकनगर भागातील पती पत्नीला ही लागण झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 12 झाली आहे.

ठाण्यात मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. पहिला रुग्ण ठाण्यात आढळल्यानंतर तब्बल दोन आठवडय़ांनी रुग्णांच्या संख्येत दिवसाला वाढ होतांना दिसत आहे. कळव्यातील 5 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर याच भागातील आणखी दोघांना याची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पती पत्नीचा समावेश आहे. हे दोघे 18 मार्च रोजी युके वरुन आले होते. 21 मार्च रोजी त्यांना त्रस होऊ लागल्यानंतर 23 मार्च रोजी त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता वर्तकनगर भागातील अन्य एका दामप्त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. हे दामप्त्य 15 मार्च रोजी युएस वरुन आले होते. 21 मार्च रोजी त्यांना त्रस होऊ लागल्याने ते खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यानंतर आता त्यांचाही रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे आता शहरातील रुग्णांची संख्या 12 झाली असल्याची माहिती पालिकेने दिली. कोरोना आता तिस-या स्टेजला आला असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडू नये आवाहन पालिकेने केले आहे.