तबलिगींच्या संपर्कात आले असाल तर उपचारांसाठी हजर व्हा, बीड कलेक्टरांचा 24 तासांचा अवधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा देशभर वेगाने प्रसार होत आहे. मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत, त्या उपाययोजनांना यशही मिळत आहे. कोरोना नियंत्रित आणण्यासाठी तबलिगी जमातीच्या कोणी संपर्कात आले असेल तर त्यांनी स्वतःहुन पुढे यावे असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केलं आहे.

तबलिगी जमातीच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात मोठा वेळ जात आहे आणि यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होऊ शकतो, पुढच्या 24 तासांचा अवधी देत आहोत. त्यांनी उपचारासाठी हजर व्हावे, नसता त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.

त्यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हंटले आहे, कोरोनाचा प्रसार रोखण्यात आम्हाला बऱ्यापैकी यश मिळत आहे. मात्र तबलिगी जमातीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या जमातीतील लोकांच्या कोणी संपर्कात आले असेल तर त्यांनी पुढे येऊन शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हजर व्हावे. त्यांना शोधण्यात वेळ जात आहे, या वेळेत कोरोनाचा प्रसार अधिक वाढेल. संपर्कात आलेल्या नागरिकांना 24 तासांचा अवधी दिला जात आहे. मात्र असे लोक भीतीपोटी समोर न आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा राहुल रेखावार यांनी दिला आहे.