
गोव्यातील 100 खलाशांसह गोव्यात गेलेले पर्यटक जहाज मुंबईला परत पाठवण्याचा निर्णय गोवा सरकारने घेतला आहे. जहाजातील सर्व खलाशांना मुंबईत उतरवून त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यानंनतर गोवा सरकार विशेष बस पाठवून त्यांना गोव्यात नेणार आहे. तिथे त्यांची पुन्हा तपासणी करून गरजेनुसार 14 किंवा 21 दिवस त्यांना पुन्हा क्वारंटाइन करण्यात येणार आहे, अशा माहिती देण्यात आली आहे.
या जहाजात गोव्यातील 100 खलाशांसह मुंबईतील 400 खलाशी आहेत, अशी माहिती बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांनी दिली. गोव्याच्या समुद्रात खलाशांना घेऊन जहाज आल्याचे समजताच लोबो यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी हे जहाज मुंबईला परत पाठवून खलाशांना मुंबईतच क्वारंटाइन केल्यानंतर त्यांना गोव्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती लोबो यांनी दिली.


























































