
संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन जारी केला आहे. हिंदुस्थानातही 21 दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे. घाई गडबडीत जर लॉकडाऊन हटवला तर त्यामुळे भयंकर परिणाम होतील असा इशार जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.
In the past week, we’ve seen #COVID19 slowing in some countries in Europe, like and . At the same time, we are now seeing clusters of cases and community spread in more than 16 countries in Africa. #coronavirus https://t.co/AymxBKcCSw
— Tedros Adhanom Ghebreyesus (@DrTedros) April 10, 2020
जिनिव्हामध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम म्हणाले की, जर आपण घाई घाईत लॉकडाऊन हटवला तर कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. लॉकडाऊन हटवावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे, परंतु ते सध्या शक्य नाही. कोरोना संकटाचा सामना करणे गरजेचे आहे अन्यथा याची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागेल असे टेड्रोस म्हणाले.
जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. युरोपीयन देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. युरोपमध्ये काही देश लॉकडाऊन हटवण्याच्या विचारात आहे. त्या पार्श्वभुमीवर टेड्रोस यांनी लॉकडाऊनचे महत्त्व अधोरिखित केले आहे.






























































