शहाण्याला शब्दाचा मार; कोल्हापूर पोलिसांची नामी युक्ती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात नागरिकांनी घराबाहेर विनाकारण पडु नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.तरी सुद्धा काही महाभाग कायद्याचे उल्लंघन करताना दिसत आहे.पोलिसांकडुन लाठींचा प्रसाद आणि दंडात्मक कारवाई करुन सुद्धा काहीजण मोकाट फिरताना आढळून येत आहेत.

पण शहाण्याला शब्दाचा मार या उक्तीप्रमाणे करवीर विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी केलेली ‘ बेजबाबदार सेल्फी पाॅईंट ‘ ची युक्ती चफल्लकपणे सर्वांचे लक्ष वेधत आहे.विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना वारंवार सांगून देखील न ऐकल्याने,कळंबा येथे करवीर पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या वतीने ‘ सेल्फी विथ बेजबाबदार नागरिक ‘ हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.येथे अत्यावश्यक कामशिवाय बाहेर पडणाऱ्यांचे सेल्फी काढण्यात येणार आहेत.