
गेवराई येथील कोरोना संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्या रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर सॅम्पल पुन्हा तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला तो कोरोना निगेटिव्ह होता, मग त्याचा मृत्यू कशाने झाला याचा शोध घेतला जाणार आहे.
गेवराई येथील एक गंभीर रुग्ण कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी दाखल झाला होता. त्याची तपासणी करण्यात आली मात्र तो कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही तासात उपचार करत असताना त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यू नंतर पुन्हा सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तो रुग्ण दुसऱ्यांदा कोरोना निगेटिव्ह आला आहे. आता त्या रुग्णाचा मृत्यू नेमका कशाने झाला, हा सवाल उपस्थित होत आहे.
























































