
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील विविध देशांमध्ये वर्क फ्रॉम होम म्हणजेच शक्य ते सर्व लोक घरून काम करत आहेत. अशावेळी ऑफिसमधील मीटिंग व्हिडीओ कॉलिंगद्वारे घेतली जाते. या मीटिंगसाठी लोक ऑफिस प्रमाणे तयार होऊन बसत नाहीत. तर फक्त चेहरा दिसतो म्हणून घरातल्याच अवतारात बसतात. मात्र योग्य काळजी न घेतल्यास त्यांचे हे स्वरूप सहकार्यांना समोर उघडं पडतं आणि फजिती उडते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सहकारी मीटिंगनंतर व्हिडिओ कॅमेरा बंद करण्याचे विसरतो आणि तसाच उठून जातो, तेव्हा इतर सहकाऱ्यांना तो टी शर्टखाली फक्त अंडरपॅन्ट घालून बसलाय असं दिसतं आणि सगळेजण पोट धरून हसायला लागतात.
The problems of videoconferencing…especially if you forget to close the call @Rakeshdhiman54 https://t.co/2plpgbTFni
— Harsh Goenka (@hvgoenka) April 14, 2020
हर्ष गोइंका यांनी आपल्या व्हेरिफाईड ट्विटर हँडल वरून विदेशातील एक गमतीशीर व्हिडिओ ट्विट केला आहे. ‘व्हिडीओ कॉलिंग करताना व्हिडीओ कॉलिंग करताना हा प्रॉब्लेम आहे… जेव्हा आपण कॅमेरा बंद करायचं विसरतो तेव्हा…’ असं लिहीत त्यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे. एक मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला ऑफिसेमधील चौघे सहकारी मीटिंग संपल्याचे बोलतात. यादरम्यान एक सहकारी व्हिडिओ कॅमेरा बंद झाला आहे असा समज होऊन उठून जातो त्यावेळी इतर सहकारी व्हिडीओ कॉलिंगवरच असतात आणि तो अंडरपॅन्ट वर बसला होता असं दिसतं तिघेही पोट धरून हसतात. त्याला आवाज देण्याचा प्रयत्न करतात मात्र तो दूर गेल्याने त्याला आवाज जात नाही. अखेर एक महिला सहकारी त्याला मोबाईलवर कॉल करते आणि त्याचा व्हिडीओ कॅमेरा सुरू असल्याचे त्याला सांगते. आपली फजिती झाल्याचे लक्षात येताच हा सहकारी धावत आतल्या खोलीत निघून जातो.
दरम्यान, याआधी एका बड्या उद्योगपतीने देखील व्हिडिओ कॉलिंग दरम्यान आपण पण लुंगीवर बसत असल्याचं सांगितलं होतं. मात्र असं असलं तरी आपली फजिती होऊ नये म्हणून व्हिडिओ कॉलिंग दरम्यान सर्वतोपरी खबरदारी घ्या. कॉल पूर्ण बंद झाला आहे की नाही हे तपासा, नाहीतर सगळ्यांसमोर आपलं हसू होईल.






















































