कोपरगावतील उर्वरित आठ जणांचे अहवालही कोरोना निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव येथील कोरोना रुग्णांच्या संपर्कातील उर्वरीत 8 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना कोपरगाव येथील एका हॉटेलमध्ये इन्स्टीट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. सर्व 18 संशयितांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोपरगाव शहरात एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा झपाट्याने कामाला लागली आहे. आरोग्य आणि महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन सर्वजण वेगाने कामाला लागले आहेत. शनिवारी 17 जणांना तपासणीसाठी जिल्हा सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तर एक जणाला आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये इन्स्टीट्यूशनल क्वॉरंटाईन करण्यात आले होते. रविवारी 10 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले होते तर उर्वरित आठ जणांचे अहवाल येण्याचे शिल्लक होते. कोरोना बाधित महिलेचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान सुरू असताना मृत्यू झाला. तर मंगळवारी उर्वरित आठ जणांचे तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून इतर ठिकाणच्या दोन जणांना तपासणीसाठी नगर येथे पाठवल्याची माहिती डॉक्टर फुलसौंदर यांनी दिली.