मालवण शहरात परजिल्ह्यातील भाजीपाला, फळांना बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांची तातडीची बैठक नगराध्यक्ष महेश कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली‌. मालवण नगरपरिषद हद्दीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरून येणारा भाजीपाला व फळे यांच्यावर 18 एप्रिल पासून बंदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शहरात भाजी विक्रेते फळविक्रेते यांच्याकडे शिल्लक असलेला भाजीपाला व फळांची विक्री करण्यासाठी 19 एप्रिलपर्यंत सूट देण्यात आली आहे.

परजिल्ह्यातील येणारी भाजी व फळे यांना बंदी घालण्यात आली असली तरी मालवणातील स्थानिक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजीपाला, फळे विक्रीसाठी सूट देण्यात आली आहे. मात्र, विक्रेत्यांनी जिल्ह्याबाहेरून भाजी, फळे आणून मालवण शहरात विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली. भाजी व फळे प्रामुख्याने अन्य जिल्ह्यातून, राज्यातून येतात. त्या ठिकाणी कोरोना रुग्ण असण्याची शक्यता असल्याने कोरोना रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.