
लॉकडाऊनमुळे शेतकऱयाना आपला भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन विकणे अशक्य झाले आहे. यामुळे अडचणीत आलेल्या बीड जिह्यातील परळी येथील जवळपास 100 वयोवृद्ध शेतकरी व व्यापाऱयानी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयाकडे आज सकाळी धाव घेतली. धनंजय मुंडे यांनी तात्काळ या सर्व शेतकऱयाकडील अंदाजे दीड लाख रुपये किंमतीचा भाजीपाला’नाथ प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेमार्फत विकत घेऊन त्यांना दिलासा दिला.
भाजी मार्केट बंद केल्याने शेतकऱयांना आता गल्लोगल्ली जाऊन भाजीपाला विकावा लागत आहे. परळी व परिसरातील काही शेतकर्यांचे भाजीपाला उत्पादन जास्त प्रमाणावर आहे, अशा शेतकऱयांना दररोज तो शहरात आणून फिरून विकणे शक्य होत नाही. वयोवृद्ध शेतकऱयांची तर यामुळे अडचण होते. या सर्व शेतकऱयांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. दरम्यान शेतकऱयांनी आणलेला भाजीपाला वाया जाऊ नये म्हणून त्याची खरेदी करून मुंडे यांनी शेतकऱयांना दिलासा दिला, त्या शिवाय गरजू नागरिकांना त्याचे मोफत वाटप करून माणुसकीही दाखवली.
भाजीपाला ठोक विक्रीचे बीट सुरू करणार
शेतकऱयांनी भाजीपाला रस्त्याच्या कडेला बसून विकण्याबाबत परवानगी मागितली आहे तर काहींनी भाजीपाला ठोक विक्रीचे बीट सुरू करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकाऱयांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन मुंडे यांनी सर्व शेतकऱयांना दिले.




























































