
कोकणातील सर्वसामान्य लोकांना कोरोनाच्या काळात वितरण केले जाणारे धान्य कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणात आणले गेले आहे. कोरोनामुळे देशातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली असताना सर्वसामान्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचविण्यात कोकण रेल्वे महत्वाची भूमिका बजावत आहे.
अन्न धान्य भरलेली 42 वॅगनची मालगाडी रत्नागिरी मध्ये दाखल झाली आहे. या माल गाडीतून 2655 टन रत्नागिरी जिल्ह्यासाठी दाखल झाले आहे. हे धान्य भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून जिल्हा भर वितरीत करण्यात येणार आहे. कोरोनानंतर सर्वत्र लॉकडाऊन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे धान्यही कोकण रेल्वेच्या माध्यमातुन झाराप स्थानकावर उतरवण्यात आले आहे.तर रो रो च्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूची नियमित वाहतुक सुरू आहे. राष्ट्रीय संकटाच्या काळात सर्व आवश्यक त्या खबरदारी घेत कोकण रेल्वे जीवनावश्यक वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यात महत्वाचं काम करत आहे.



























































