
संगमनेर शहरातील 3 आणि आर्श्वी बुद्रुक येथील 1 असे चारजण कोरोना बाधीत रुग्णांचा 14 दिवसानंतर दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यासह जामखेडच्या चौघाजणांचा 14 दिवसांचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
नगर जिल्ह्यात हे आठजण कोरोनामुक्त झाले आहे. या सर्वांना रविवारी बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार आहे. डिस्चार्जनंतर या सर्वांना विलगीकरणासाठी संगमनेर आणि जामखेड येथे ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.




























































