केंद्राच्या लक्ष्मण रेषेचे ‘या’ राज्याकडून उल्लंघन, केंद्रीय गृहमंत्रालयाने धाडलं पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kerla-police

‘कोरोना’ संकटाचे ढग अद्यापही सरलेले नाहीत, मात्र आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारचे निर्देश आणि सूचनांनुसार 20 एप्रिल पासून अनेक राज्यांनी लॉकडाऊन मध्ये थोडी सूट दिली आहे. मात्र त्यावेळी हॉटस्पॉट, सोशल डिस्टन्सिंग अशा विविध गोष्टी ध्यानात घेण्यात आल्या आहेत. मात्र या दरम्यान केरळ सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या गाइडलाइनकडे दुर्लक्ष करत लॉकडाऊन सूट देताना नवा आदेश जारी केला आहे. या गाइडलाइन बदल केल्याने गृह मंत्रालय नाराज असून केरळ सरकारला यासंदर्भात पत्र लिहून खुलासा मागवण्यात आलेल्याची माहिती सूत्रांनी दिल्याचे पीटीआयच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

केरळ सरकारने आदेश संख्या 78/2020 / GAD तारीख 17.04.2020 रद्द केला आणि लॉकडाऊनमध्ये सूट देण्यासंदर्भात सुधारित गाइडलाइन जारी केली आहे. या गाइडलाइनमध्ये केरळ सरकारने त्या सेवांना सूट दिली आहे ज्यांना 15 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या गृह मंत्रालयाच्या गाइडलाइन मनाई केली आहे.

केरळ सरकारने स्थानीय कार्यशाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सलून, रेस्टोरंट, पुस्तक विक्रीची दुकाने, नगरपालिका क्षेत्रातील छोटे आणि मध्यम उद्योग, कमी अंतरातील शहर आणि वस्त्यांमध्ये बस सेवा, चार चाकी गाडीच्या मागच्या सीटवर दो प्रवाशांना बसण्याची सूट अशा अनेक परवानग्या दिल्या आहेत. मात्र केंद्राच्या गाइडलाइनमध्ये वरील सर्व गोष्टींना मनाई केली आहे.

आता केंद्र सरकाराच्या पत्राला केरळचे राज्य सरकार काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच यामुळे केंद्र सरकार आणि केरळ सरकार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

‘या’ राज्यामध्ये रेस्टॉरन्ट्स सुरू, खासगी गाड्यांनाही सशर्त परवानगी