शंभर वर्षांपूर्वीचा पुतळा वादळाने कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणारे व समस्त नागपूरकरांचे प्रेरणास्थान असणाऱ्या कस्तुरचंद डागा यांचा पुतळा शंभर वर्षापूर्वी कस्तुरचंद पार्कवर उभारण्यात आला होता हा पुतळा शनिवारी रात्री आलेल्या वादळाने कोसळला. नागपुरातील उद्योग आणि सहकार क्षेत्राच्या उभारणीत डागा यांचा मोलाचा वाटा आहे टेक्सटाईल मिल्स, खाण, रुग्णालय, शिक्षण संस्था डागांनी उभ्या केल्या सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते दानशूर व्यक्ती अशी त्यांची ख्याती होती मुळचे राजस्थानचे असणारे डागा नागपुरात स्थायिक झाले शहरातील ऐतिहासिक कस्तुदचंद पार्क मैदानाची जागा त्यांनीची दिलेली आहे 20 जानेवारी 1917 रोजी वयाच्या 62 व्या वर्षी सेठ कस्तुरचंद डागा यांचे निधन झाले होते त्यांच्या निधनानंतर कस्तुरचंद पार्कला त्यांचे नाव देण्यात आले मुंबईचे प्रसिद्ध कलावंत सी के मात्रे यांनी हा पुतळा साकारला होता तसेच त्यावेळी गव्हर्नर असणाड्ढया फ्रॅक स्लाय यांच्या हस्ते 1924 मध्ये या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले ब्रिटीश सरकारने डागा यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना दिवाण बहादूर सर या उपाधीने सन्मानित केले होते.

कस्तूरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते या कामादरम्यान काही महिन्यांपूर्वी मैदानाचे खोदकाम सुरू असताना दोन ते तीन फुटांवर काही तोफा सापडल्या. प्रशासनाने या मैदानाला ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. सौंदर्यीकरण करताना मैदानात कुठेतरी सेठ कस्तूरचंद डागा यांचे स्मारक उभारले जावे. या मैदानाचा इतिहास लोकांच्या माहितीसाठी तेथे फलक स्वरूपात लिहिला तर भविष्यातील पिढयांना या मैदानाचे ऐतिहासिक महत्त्व ज्ञात राहील, अशी नागपूरकरांची भावना आहे.