मुंबई गोवा मार्गावरील गोशाळेला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई -गोवा मार्गावरील लोटे येथील गोशाळेला गुरुवारी मध्यरात्री भीषण आग  लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही परंतु लाखो रुपयांचे गवत जळून खाक झाले. त्यामुळे आता येथील गुरांची उपासमार होणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान संचलीत गोशाळा धामणदेवी लोटे येथील या गोशाळेच्या 3 चारा डेपोंना भीषण आग लागली.  या आगीत लाखो रूपयांचा शेकडो टन चारा (कडबा) आगीत जळून खाक झाला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी असणारे चारा ठिकाणी ही आग लागली. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही. या आगीमुळे 600 हुन जास्त गुरांची चाऱ्या अभावी  उपासमार होणार आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचले. सकाळी ७ वाजेपर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. येथील जनावरांची होणारी उपासमार लक्षात घेत जनतेनी आता येथील गुरांसाठी मदत म्हणून चारा आणि मदत द्यावी असे आवाहन येथील  गो शाळेचे संचालक ह. भ. प. भगवान कोकरे यांनी केले आहे.