
बॉलीवूडमधील कलाकारांच्या लव्ह लाईफच्या गोष्टी चवीने चघळल्या जातात. अनेकदा चित्रपट इंडस्ट्री मधील कलाकार, निर्माते यांनाच बॉलीवूडकर डेट करतात किंवा लग्न करतात. मात्र याला एक अभिनेत्री अपवाद असून तिने आपल्याला कोणत्याही अभिनेत्याला डेट करण्याची इच्छा नसल्याचे बोलून दाखवले आहे..
एका मुलाखतीत बोलतात अभिनेत्री भूमी पेंडणेकर म्हणाली की, मला कोणत्याही अभिनेत्याच्या रिलेशनशिपमध्ये राहण्याची इच्छा नाही. चित्रपट इंडस्ट्री मध्ये नसणाऱ्या व्यक्तीला आपल्याला डेट करायचे आहे, कारण ते संबंध इतर संबंधापेक्षा दीर्घकाळ चालतील, असे भूमी म्हणाली. यामागील कारणांचा देखील तिने खुलासा केला आहे.

भूमी म्हणते की, जर मी एखाद्या अभिनेत्याला डेट केले तर माझे आयुष्य एका मर्यादित कक्षेत बंद होऊन जाईल. मला नाही वाटत की माझे आयुष्य फक्त चित्रपट आणि चित्रपटामध्येच गुंतून रहावे. म्हणून मला कोणत्याही अभिनेत्याला डेट करायची इच्छा नाही.
दरम्यान, भूमी पेंडणेकर करण जोहर याच्या आगामी ‘तख्त’ या महत्वकांक्षी चित्रपटात काम करत आहे. गेल्या वर्षी ती ‘बाला’ या चित्रपटात दिसली होती कानी हा चित्रपट तुफान चालला होता. तसेच तिने ‘सांड की आंख’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती.






























































