ज्ञानदीप अखंड तेवणार, फेसबुकने उचललं महत्त्वाचं पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढत असताना देखील अध्‍ययन प्रक्रिया सुरळीत राहण्‍यासाठी फेसबुकने ‘सपोर्टिंग एज्‍युकेशन कम्‍युनिटीज: अॅन ऑनलाइन लर्निंग रिसोर्सेस गाइड’ (‘Supporting Education Communities: An Online Learning Resources Guide’) हे ऑनलाइन गाइड सादर केले आहे. हे ऑनलाइन टूल शैक्षणिक ग्रूपना फेसबुक उत्‍पादने, साधने व प्रोग्राम्‍सचा वापर करत कशाप्रकारे अध्‍ययन प्रक्रिया सुरू ठेवावी यासंदर्भात मार्गदर्शन करेल आणि योग्य अशा स्रोतांच्‍या माध्‍यमातून कोविड-19 शी संबंधित माहिती देखील देईल. सध्‍या हे गाइड इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती व कन्‍नड भाषेमध्‍ये उपलब्‍ध आहे.

पहिल्‍या टप्‍प्‍यासाठी फेसबुकने युनेस्‍कोसोबत भागीदारी केली आहे. युनेस्‍को गाइड हिंदुस्थानातील विद्यार्थी, शैक्षणिक संस्‍था व शिक्षकांपर्यंत पोहोचण्‍याची खात्री घेण्‍यामध्‍ये पाठिंबा देईल. तसेच संबंधित अध्‍ययन संसाधनांसह गाइडचे अपडेशन व निर्मितीमध्‍ये देखील साह्य करेल.
हे ऑनलाइन संसाधन शैक्षणिक समुदायांना फेसबुक पेजेस्, फेसबुक ग्रुप्‍स, फेसबुक लाइव्‍ह, मॅसेंजर, व्‍हॉट्सअॅप व इन्‍स्‍टाग्राम अशी फेसबुक उत्‍पादने व साधनांचा वापर करत कशाप्रकारे सहयोग जोडावा यांसदर्भात साह्य व मार्गदर्शन करेल. तसेच लोकांना विश्‍लेषक विचार करण्‍यामध्‍ये आणि त्‍यांचे विचार ऑनलाइन शेअर करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी फेसबुकचा डिजिटल साक्षरता प्रोग्राम ”वी थिंक डिजिटल” (We Think Digital) मधील मॉड्यूल्‍स देखील आहेत. हे गाइड भारत सरकारचे सल्लागार (Government of India’s advisory), डब्ल्यूएचओ इंडिया सिचुएशन रिपोर्ट पेज (WHO India Situation Report Page), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare), फेसबुकवरील कोरोनाव्हायरस रिसोर्स हब ( Coronavirus Resource Hub on Facebook), आणि युनिसेफकडून शाळांमधील कोविड-19 चे प्रतिबंध व नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन (Guidance from UNICEF on COVID-19 prevention and control in schools) अशा अधिकारात्‍मक व विश्‍वसनीय स्रोतांकडून कोविड-19 बाबत महत्त्वपूर्ण माहिती देखील देईल. यामुळे त्‍यांना सुरू असलेल्‍या महामारीबाबतची चिंता दूर करण्‍यामध्‍ये आणि चुकीची माहिती समजण्‍यामध्‍ये मदत होईल.

या सादरीकरणाबाबत बोलताना फेसबुक इंडियाचे संचालक व भागीदारी प्रमुख मनिष चोप्रा म्‍हणाले, ”या कठीण काळामध्‍ये लोकांनी कनेक्‍टेड राहणे आणि कोविड-१९ बाबत विश्‍वसनीय माहिती उपलब्‍ध होणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. आमच्‍या ऑनलाइन अध्‍ययन संसाधन गाइडच्‍या माध्‍यमातून आम्‍ही शिक्षक, पालक व संबंधित अधिका-यांना मोठ्या प्रमाणात संसाधने व साधनांसह सुसज्‍ज करू इच्छितो. ज्‍यामुळे त्‍यांना कनेक्‍टेड राहण्‍यामध्‍ये आणि डिजिटली सहयोग जोडत दूरूनच अध्‍ययन सुविधा देण्‍यामध्‍ये मदत होईल. आम्‍ही आशा करतो की, ते या संसाधनांचा लाभ घेत अध्‍ययन प्रक्रिया सुरू ठेवतील.”
बांग्‍लादेश, भूतान, हिंदुस्थान, नेपाळ, मालदिव व श्रीलंकासाठी युनेस्‍को नवी दिल्‍ली क्‍लस्‍टर ऑफिसचे संचालक व युनेस्‍को प्रतिनिधी एरिक फाल्‍ट म्‍हणाले.

कोविड-19 प्रादुर्भावामुळे आरोग्‍यविषयक संकटासोबत अध्‍ययन समस्‍या देखील निर्माण झाली आहे. शाळा व विद्यापीठे बंद असल्‍यामुळे जगभरातील 90 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्‍यांच्‍या अध्‍ययनावर परिणाम झाला आहे. मात्र या माध्यमातून अंतिम विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे काम सुरू राहील. तसेच हाय-टेक, लो-टेक व नो-टेक दृष्टिकोनांचा लाभ घेत दूरस्थ शिक्षण सुविधा देण्‍यासाठी योग्‍य संदर्भीय सोल्‍यूशन्‍ससह ऑन-ग्राऊण्‍ड गरजांची पूर्तता करण्‍यात येईल. तसेच मुलींना शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध करून देण्यावर अधिक भर देण्‍यात येईल. अशा प्रयत्‍नांसाठी तंत्रज्ञान अत्‍यंत महत्त्वाचे ठरेल, असेही यावेळी सांगण्यात आले.