
धाराशीवमधील कळंब येथील शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर व प्रा.अंजली अशोकराव मोहेकर दाम्पत्यांने कोरोना विरोधातील लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपल्या निवृत्तीवेतनामधून 1 लाख 10 हजार रूपयाची मदत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस योगदान देण्याचे आवाहन केल होते. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत फुल नाही फुलाची पाकळी म्हणुन मोहेकर कुटुंबांनी मदत देण्याचे ठरवले.
धाराशीव जिल्हयातील कळंब येथील प्राचार्य डॉ अशोकराव मोहेकर यांचे शिक्षण व सामाजीक क्षेत्रात मोठं योगदान आहे. महापूर असो , दुष्काळ असो , धार्मिक सामाजिक कार्यक्रम असोत, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी असो ते नेहमी मदत करण्यासाठी अग्रेसर असतात . त्यांनी अनेकांची अडलेली शिक्षणे स्वतः फी भरून पूर्ण केली आहेत .कोरोना महामारीच्या संकटाने देशात हाहाकार माजवला त्यामुळे प्राचार्य डॉ अशोकराव मोहेकर व प्रा. अंजली मोहेकर यांनी आपल्या निवृत्तीवेतनातून मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्यांनी कळंबच्या तहसीलदार मंजूषा लटपटे यांच्याकडे एक लाख दहा हजार रूपयाचा धनादेश सुपूर्द केला आहे. सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनिल पवार हेही होते.






















































