नगर जिल्ह्यात दररोज मिळणार 4 हजार 700 थाळी शिवभोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना 28 मार्च ते 20 एप्रिल या दरम्यान शिवभोजन थाळी वाटपची संख्या 5 लाखांनी घटली आहे. यामुळे राज्य सरकारने हे घटलेले प्रमाण भरून काढण्यासाठी 23 एप्रिल ते 2 मे या कालावधीत शिवभोजन थाळी वाटप दीड पटीने वाढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नगर जिल्ह्यात दररोजच्या 3 हजार 200 शिवभोजन थाळीची संख्या आता 4 हजार 700 पेक्षा अधिक होणार आहे.

राज्यातील महाविकास आघाडीने गरीब लोकांसाठी 10 रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली आहे. या थाळीचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून ही थाळी तालुका पातळीवरही सुरू करण्यात आली. मात्र, नगरसह राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढल्याने सरकारने नियोजित केलेल्या शिवभोजन थाळीच्या उद्दिष्टात घट झाली आहे. यात 28 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान शिवभोजन थाळी वाटपची संख्या 5 लाखांनी घटली असल्याने ही घट भरून काढण्यासाठी 23 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सुरू असणाऱ्या शिवभोजन थाळी वाटप दीड पटीने वाढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यात आता 4 हजार 700 पेक्षा अधिक शिवभोजन थाळी मिळणार आहे.