
मुंबई पोलिस दलासाठी आज धक्कादायक घटना घडली. कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाल्यामुळे एक काॅन्सेटबलचा दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू होण्याची मुंबईतील ही पहिलीच घटना आहे.
कोरोनाचा बळी ठरलेले 57 वर्षीय काॅन्स्टेबल वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तर वरळी नाका येथील प्रेमनगर काॅलनीत राहत होते. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. 22 एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण कोरोना विरोधातील त्यांचा लढा अयशस्वी ठरला आणि आज अखेर त्यांचा मृत्यू झाला.

































































