
नागपूर जिल्ह्यातील कामठी येथून बुलढाण्यात धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या 11 जणांपैकी तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुलढाणा येथे 20 मार्च पासून धार्मिक कार्यासाठी या सर्व व्यक्ती आल्या होत्या.
दरम्यान, या अकरा जणांचे 25 एप्रिल रोजी अकोला येथील प्रयोगशाळेत स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पॉझिटिव रुग्णांची संख्या आता 24 झाली आहे. दरम्यान यापैकी 15 जणांना आतापर्यंत बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


























































