डिग्रस बंधाऱ्य़ातून नांदेडला पाणी, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात कार्यवाही पुर्ण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणी तालुक्यातील डिग्रस उच्च पातळी बंधाऱ्यांतून सोमवारी पहाटे पाच ते सहा या वेळेत पोलिस बंदोबस्तात सहा गेटद्वारे पात्रात नांदेडकरांसाठी शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात सोडण्यात आले. गेट क्रंमाक 3,6,9,11,12 व 13 मधून  पाणी गोदापात्रात सोडले  गेले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन.पी गव्हाणे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार ज्योती चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्डीले यांच्यासह मोठा पोलीस कर्मचाऱ्यांचा  बंदोबस्त तैनात होता.

शाखा अभियंता के.पी.पोपळे, अनिरुद्ध कूलकर्णी, आर पी कातकडे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या पाण्याने नांदेड करांचा 31जुलै पर्यत पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याची माहिती शासकीय सुत्रांनी दिली.