
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने 3 मे पर्यंत देशात लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीत लोक आपली वैयक्तिक वाहने एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलवू शकत नाहीत. अधिक दिवस वाहन सुरु न केल्यास वाहनाच्या बॅटरी आणि इतर पार्ट्समध्ये बिगाड होण्याची शक्यता निर्माण होते. आज आम्ही तुम्हाला लॉकडाऊनमध्ये आपल्या वाहनांची देखभाल करण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत.
वाहन देखभाल टिप्स –
टिप-1 सर्वात प्रथम वाहन सुरू करा आणि सुमारे 15 मिनिटे इंजिन सुरु ठेवा. बॅटरीची स्थिती ठीक राखण्यासाठी असे किमान महिन्यातून एकदा तरी करा.
टिप-2 वाहन सुरू करा आणि हेडलाइट सुमारे 30 मिनिटे सुरु ठेवा. स्मार्ट हायब्रिड टेक आणि लिथियम-आयन बॅटरी असलेल्या वाहनांसाठी महिन्यातून एकदा तरी हे करा.
टिप-3 वाहन सुरू केल्यानंतर वाहन मागे पुढे करा आणि टायर्सचा प्रेशर चेक करा. असे केल्याने आपले टायर नुकसानीपासून सुरक्षित राहील.
टिप-4 हँड ब्रेक काढला जाऊ शकतो आणि या जागी टायर स्टॉपर लावला जाऊ शकतो.




























































