पठाणांच्या घरी जन्मलेला ब्राह्मण, असे इरफानचे वडील का म्हणायचे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इरफान खान यांचा जन्म राजस्थानच्या मुस्लिम पठाणांच्या घरात झाला होता. त्यांच्या आई राजघराण्यातल्या होत्या. परंतु इरफान हा पठाणांच्या घरात जन्मलेला ब्राह्मण आहे असे त्यांचे वडील म्हणायचे.

इरफान खान यांचे वडील जागिरदार खान यांना शिकार करण्याची खूप हौस होती. ते लहानग्या इरफानलाही शिकारीला घेऊन जायचे. इरफानही उत्सुक असायचा पण जंगल बघण्यासाठी ना की शिकार करण्यासाठी. एका प्राण्याला मरताना पाहिल्यास इरफान यांना आवडत नसे. जो प्राणी मेला आहे त्याच्या मुला बाळांचे काय होत असेल असा विचार इरफान करत असे. एकदा वडिलांनी इरफानच्या हातात बंदूक देऊन एका प्राण्याची शिकार केली. तेव्हा इरफानला खूप वाईट वाटले. तेव्हा इरफानचे वडील म्हणायचे की हा इरफान म्हणजे पठाणांच्या घरी जन्मलेला ब्राह्मण आहे.