
लॉकडाऊन काळात क्षुल्लक कारणाबरोबरच विनाकारण रस्त्यावर मोकाटपणे वावरणार्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. एकाच दिवशी तब्बल 63 दुचाकी, 6 फोर व्हिलर गाड्या जप्त करून, संबंधितांविरूध्द गुन्हे दाखल केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर देशभर लॉकडाऊन आहे. याला स्थानिक नागरिकांतून प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही हौशी मंडळी किरकोळ कारण दाखवून दिवसभर रस्त्यावर दुचाकी घेऊन फिरत आहे. सुरूवातीला पोलिसांनी शिथील धोरण अवंलबिले. मात्र अशा लोकांमध्ये कोणताही फरक जाणवत नसल्याचे दिसून आले. 28 एप्रिलपासून पोलिसांनी आपल्या कारवाईत कडकपणा आणला आहे. परिणामी शहरात विनाकारण फिरणारी तब्बल 63 दुचाकी व 6 फोर व्हिलर जप्त केल्या आहेत. याप्रकरणी संबंधित वाहनधारकांविरोधात जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


























































