चिपळूण, संगमेश्वरात पाऊस; आंबा बागायतदारांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
दिवसभर कडकडीत उन…अचानक ढगाळ वातावरण आणि वळीवाच्या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात हजेरी लावली. चिपळूण, संगमेश्वरसह रत्नागिरीतही पाऊस पडला. पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे अजूनही मोठ्या प्रमाणात झाडावर आंबा असल्याने बागायतदारांना पावसाचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याची गळही मोठ्या प्रमाणात झाली आहे.