
नगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे 18 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 11 व्यक्तींचे अहवाल मिळाले आहेत. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित 7 अहवालांची प्रतीक्षा आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1533 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1453 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण 43 कोरोनाबाधित व्यक्तींपैकी 24 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 17 जण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. दोन कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.





























































