
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी जालना येथील राज्य राखीव दल गट क्र. 3 चे जवान बंदोबस्तासाठी गेले होते. यापैकी जालना येथे परत आलेल्या चार जवानांचे स्वॅब 1 मे रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. या चार जवानांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. परतूर येथील 24 वर्षीय तरुण मुंबई येथून आला. सदरील युवकाचा स्वॅब 1 मे रोजी प्रयोगशाळेकडून पॉझिटीव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जालना शहरातील चौधरीनगर परिसरातील एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने उपविभागीय अधिकारी जालना यांच्या आदेशानुसार चौधरीनगर, सनसिटी, पोद्दार शाळेच्या मागील व खरपुडी शिवारातील चौधरीनगरला लगत असणारी घरे हा संपूर्ण भाग एक कि.मी. परिसरातील क्षेत्र प्रतिबंधीत म्हणून घोषित करण्यात आले असून सदर क्षेत्राच्या सिमा व त्यामधील क्षेत्र तसेच चौधरीनगरमध्ये जाणाऱ्या सर्व बाजुच्या रस्त्याच्या सिमा सिलबंद करण्यात आल्या आहेत.

































































