इचलकरंजीतील कोरोना मुक्त बालकास डिस्चार्ज, आजोबांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाबाधितांची संख्या तीनवर पोहोचल्याने आणि यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने, धास्तावलेल्या इंचलकरंजीकरांना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. येथील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने, आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्याला सध्या हातकणंगले येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे.नरुग्णालयाचे प्रशासन अधिकारी ॕलडॉ. महेश महाडीक यांनी याबाबत माहिती दिली.

इचलकरंजीमधील कोलेमळा परिसरात पहिल्या कोरोना बाधित रुग्ण असणाऱ्या आजोबांच्या संसर्गात हा चार वर्षीय नातू आला होता. 20 एप्रिल रोजी त्याला आयजीएममध्ये दाखल करुन स्वाब घेतला असता अहवाल पाॕझीटिव्ह आला होता. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवीकुमार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप मिरजकर, डॉ. शोएब मोमीन आणि त्यांचे पथक या बालकावर उपचार करत होते. चौदा दिवसा नंतर 3 आणि 4 मे रोजी घेतलेल्या दोन्ही स्वाबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तो कोरोनामुक्त झाला. त्यामुळे आज सायंकाळी रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात या बालकाला निरोप दिला.

चार दिवसांपूर्वीच या बालकाच्या कोरोना बाधीत आजोबांचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.