संभाजीनगरमध्ये आणखी सहा कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संभाजीनगर येथील चिकलठाण्यात जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर दुसरा स्वॅब निगेटिव्ह आल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या 6 रुग्णांना बुधवारी दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान डिस्चार्ज देण्यात येणार आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. या 6 जणांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता कोरोनामुक्त नागरिकांची संख्या 31 वर पोहोचणार असल्याचेही डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

घाटी रुग्णालयात 45 जणांचे स्क्रिनिंग 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात दुपारी 4  वाजेपर्यंत एकुण 45 रुग्णांची स्क्रीनिंग करण्यात आली. त्यापैकी 20 रुग्णांचा स्वॅब घेण्यात आला असून 2 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तसचे 18 रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यापैकी कैलासनगर येथील  20 वर्षीय तरुण रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तसेच हिंगोली येथील एसारपीएफ कॅम्प मधील 35 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह रुग्णास चिकलठाणा  येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथुन शासकीय वैद्यकीय महाविद्याय व रुग्णालय येथे आज संदर्भित  करण्यात आले आहे. या रुग्णालयात दुपारी 4 वाजेपर्यत एकुण 77 रुग्ण भरती आहेत.

घाटीच्या कोविड रुग्णालयात एकुण 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. यापैकी 19 रुग्णांची स्थिती सामान्य असुन 2 रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच सद्यस्थितीत घाटी रुग्णालय येथे 38 कोरोना निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजवर एकूण 12 कोरोना  रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.