संघाबाहेर फेकला गेल्यावर टीम इंडियाच्या खेळाडूचा निवड समितीवर गंभीर आरोप, म्हणाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियातून बऱ्याच काळापासून बाहेर असलेला मधल्या फळीतील विस्फोटक फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरेश रैना याने निवड समितीवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर अन्याय झाला असून मला विनाकारण संघातून बाहेर काढण्यात आल्याचा आरोप रैना याने केला. मात्र माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी हा आरोप फेटाळला आहे.

प्रसाद म्हणाले, 2018- 19 या वर्षी स्थानिक स्पर्धातील रैनाची कामगिरी सुमार राहिली होती. त्याच्या खराब कामगिरीमुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले नाही. याआधी प्रसाफ यांनी धोनीच्या भविष्याबाबतही एक विधान केले होते. धोनीला वर्ल्डकपमध्ये स्थान मिळवायचे असल्यास आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करावी लागेल. मात्र कोरोनाचा पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

काय म्हणाला रैना?
एका युट्युब चॅनेलशी बोलताना रैना म्हणाला, माझ्या मते सिनियर खेळाडूप्रति निवड समितीने अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. माझ्यात काही कमतरता असल्यास याबाबत मला सांगायला हवे, त्यात मी सुधारणा करू शकेल. जर काय कमी आहे हे माहिती नसेल तर त्यात सुधारणा कशी करू शकेल? असा प्रश्न रैनाने उपस्थित केला.

दरम्यान, सुरेश रैना याने टीम इंडियाकडून 226 एक दिवसीय आणि 78 टी-20 लढती खेळल्या आहेत. तसे 18 कसोटी लढती त्याच्या नावापुढे नोंद आहेत. रैनाने आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना जुलै, 2018 ला इंग्लंडमध्ये खेळला होता. त्या नंतर झालेल्या एक दिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत त्याला स्थान मिळाले नव्हते.