
केंद्र सरकारने देशातील लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा एकदा वाढवत तो 17 मेपर्यंत असेल असे जाहीर केले. मात्र एका राज्याने ही मुदत आणखी 12 दिवसांनी वाढवायचा निर्णय घेतला आहे. तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवत असल्याचे जाहीर केले आहे. असं करणारं तेलंगणा हे देशातील पहिलंच राज्य आहे. तेलंगाणामधील लॉकडाऊन 29 मे पर्यंत लागू राहणार आहे.
Public should complete purchase of essential items by 6 pm and they should reach their residences. There will be curfew in the state from 7 pm. If anyone is found outside, police will initiate action: Telangana CM K. Chandrashekar Rao pic.twitter.com/OFJxYj74Ks
— ANI (@ANI) May 5, 2020
मंगळवारी तेलंगाणाच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला. लोकांना लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा असे वाटत असल्याने आपण हा निर्णय घेत असल्याचे राव यांनी सांगितले. केंद्र सरकारने जरी रेड झोनमधील दुकाने सुरू करायला सांगितली असली तरी आम्ही हैदराबादसह अन्य ठिकाणची दुकाने सुरू करणार नाही असेही त्यांनी सांगितले.





















































