बुलढाणा जिल्हयात 29 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यात बुधवारी मिळालेले 29 रिपोर्ट निगेटिव्ह असून आतापर्यंत 584 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 24 रुग्ण कोरोनाबधित होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 20 कोरोनाबाधित रुग्णांचा दुसरा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अशाप्रकारे घरी पाठवण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 20 असून सध्या रूग्णालयात 3 रूग्ण उपचार घेत आहेत. बुधवारी 29 अहवाल मिळाले आहेत. हे सर्व 29 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच बुधावारी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले 13 अहवाल आहेत. कोविड रूग्णालयात उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रूग्ण 3 आहेत. आतापर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 584 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.