
आज उदगीर येथील 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी करण्यात येणार आहे व एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे. उदगीर येथील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढतच जात आहे. उदगीर येथील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता 21 वर पोहचली आहे.
लातुर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 06.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाह्यरुग्ण विभागात उदगीर येथून एकूण 39 व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. कधी 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह आली असून सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार रुग्णांच्या स्वॅबची 48 तासानंतर पुन्हा तपासणी केली जाणार आहे. उदगीर येथे वाढत जाणाऱ्या रुग्ण संख्येमुळे लातूर जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.



























































