
संगमनेर येथील 73 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तालुक्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रवीण मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर व्यक्तीचा रिपोर्ट हा खासगी लॅबमध्ये पाठवण्यात आला होता, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे आता संबंधित डॉक्टरांची तपासणी करण्यासंदर्भात निर्देश प्रशासनाला दिले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संगमनेर तालुक्यांमध्ये काल खासगी रुग्णालयांमध्ये एका 73 वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. संबंधित डॉक्टरांनी त्याच्या श्रावाचे नमुने मुंबई येथील एसआरएल या खासगी लॅबला पाठवलेले होते. तोपर्यंत त्याच्यावर त्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आज त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आले त्यामुळे संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी उपचारादरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संकटातून महाराष्ट्राला एकजुटीने बाहेर काढू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
या संदर्भामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रविण मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याची माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक होते. तसेच त्या व्यक्तीचे स्रावाचे नमुने त्यांनी थेट मुंबई येथील खासगी लॅबला परस्पररित्या पाठवले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामध्ये खासगी संस्थांकडे नमुने पाठवू नये असे स्पष्ट केले होते. मात्र मुंबई येथे पाठवलेल्या स्रावाचा अहवाल गुरुवारी दुपारी प्राप्त झाला. त्या व्यक्तीला कोरोना असल्याचे उघड झाले आहे. ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले त्या डॉक्टरांना तात्काळ क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले असून संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांची तपासणी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.




























































