
हिंदुस्थानमधून चीनमध्ये काही कार्गो विमान गेले होते. त्यातील एअर इंडियाच्या पाच वैमानिकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनहून निघाण्यापूर्वी त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
सध्या परदेशातून हिंदुस्थानींना आणण्यासाठी केंद्र सरकारने वंदे भारत ही मोहीम सुरू केली आहे. एअर इंडियाने यात सहभागी होत फक्त देशवासियांना हिंदुस्थानात आणले नाही, तर कोरोनाच्या इलाजासाठी औषधं आणि सामान लागंत त्याचीही ने आण एअर इंडियाने केली आहे.
वंदे भारत मोहीमेतून हजारो हिंदुस्थानी स्वगृही परतले आहेत. गेल्या 24 तासात 800 हून अधिक हिंदुस्थानी नागरिक मायदेशी परतले आहेत. 12 देशातून हिंदुस्थानींना विमानातून परत आणण्यात येत आहे. हिंदुस्थानात 14 शहरांत 64 विमाने लँड करतील. काही विमाने छोट्या विमानतळावरही लँड करतील.
वंदे भारत मोहीमेत एअर इंडियाने कळीची भुमिका बजावली आहे. आखाती देशातून 27 उड्डाणे, संयुक्त अरब अमिरातमधून 11, बांग्लादेशमधून 7, दक्षिण पूर्व आशियातून 14, अमेरिका आणि लंडन मधून 7 उड्डाणे हिंदुस्थानसाठी रवाना झाली आहेत.






















































